वृध्दाश्रम ( अभंग रचना )
वृध्दाश्रम ( अभंग रचना )
1 min
231
मुलाच्या भविष्या I वाट दावण्या ती |
बाप करी किती | आटापिटा ॥ १ ॥
चांगल्या शाळेत I प्रवेश घेवून |
बोट ते धरून | नेई शाळा ॥ २ ॥
मूल्य संवर्धन | होईल बाळाचे I
स्वप्न त्या बापाचे | रात्रं दिन ॥ ३ ॥
लेक झाला मोठा | जास्तच शिकला |
लागे नोकरीला I गलेलठ्ठ ॥ ४ ॥
बाप अडगळ I वाटे आता त्यास |
पाठवी बापास I वृध्दाश्रम ॥ ५ ॥