निरोप
निरोप
कदाचित ही भेट माझी अखेरची ठरेल
आयुष्य जगता तुजविना जगणे संपेल
आकाश कोसळताना आज मी पाहीले
गहिवरल्या हृदयास आज मी आवरले
नको मना साद घालू व्यर्थ हे मागणे
क्षितिजापलीकडे लपेल हे सूर्य देखणे
परतीच्या पावलांनी हृदय भरुनी येई
एक एक क्षण निरोपाचा युगासम होई
घट्ट मिठी ही प्रीतीची कधी न सुटावी
आयुष्यात ही घडी प्रेमाची अशीच रहावी
अखेरचा सलाम जिंदगी श्वास ही अव्हेरे
धूसर होती स्मृती केवळ चिन्हेच इथे उरे