Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vijay Sanap

Others

3  

Vijay Sanap

Others

दगड

दगड

1 min
14.5K


दगडाचा कोणी नका करु अवमान

दगडातच आहे साऱ्या देवाचा मान ----||

दगडाला शेंदूर लावला की त्याचा देव होतो

मंदिरात जाऊन बसला की आपण भाव देतो ----||

दगडाशीवाय तुमचं पानबी हलत नाही

दगडाविना तुमचं कामबी चालत नाही -----||

माणूस मेल्यावर सुद्वा तिथं ठेवावा लागतो दगड

कारण त्याची करावी पूजा न होवो कुठली भांनगड ----||

दंगलीच्या काळात त्याचा शोध घ्यावा लागतो

समोरुन आल्यावर पळून आसरा घ्यावा लागतो ----||

दगडानेच दगडावर फुटते लग्नाची सुपारी

रानात दगडावर बसून जेवण होते दुपारी ---||

दगडानेच रचल्या जातो आपल्या घराचा पाया

दगडानेच बनली आहे शक्ती आदीमाया -----------||

दगडातच आहे माझी वेरूळची कोरीव लेणी

दगडातच लेणी अजिंठाची पाहिली का कोणी

दगडानिच फोडली जातात एकमेकांची डोके

दगडानिच पाडली जातात एस टी बसला भोके -----||

दगडातूनच निर्माण होते देवाची मूर्ती

दगडातूनच भूत काढतात भोंदू स्वार्थी -----||


Rate this content
Log in