Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Meenakshi Kilawat

Others

3.9  

Meenakshi Kilawat

Others

कविता

कविता

1 min
479



भाग्यवान समजावे ज्याला

खरच सौभाग्य मिळत असे

नाही तर नावालाच बहुतेक

सौभाग्य मिरवतात जसेतसे...


पोटच्या मुलांचा सांभाळ

करू शकत नाहीत बरोबर

धौस जमवतात बायकोवर

म्हणे मी तुझा सौभाग्यलंकार..


नशा करून लाथाभुक्कीने

बायकोला बेदम लाथाडतात

हक्क दाखवून त्या निरपराध 

बायकोला परोपरीने सतवतात...


यालाच जर कां म्हणत असेल

सौभाग्याचे अती बहूमुल्य लेणे

तर झूगारून द्यावे स्त्रीयांनी

असे विवेकहिन पुरूषांचे देणेघेणे....


सात्विकतेचे आडंबर रचून

टाकतात लग्नाच्या पायी बेड्या

उपभोग घेवून तिरस्कार करती 

अन् करतात तिच्या वावड्या....


असावे प्रेम करणारे सौभाग्य

एकमेकांप्रती विश्वास वाहणारे

सु:खदु:खात सदैव साथ देणारे

कुटूंबात खेळीमेळीत रूजणारे...


Rate this content
Log in