नाते अपुले.
नाते अपुले.
नाते अपुले युगायुगांचे,
जसे शशी अन वसुंधरेचे,
फिरत राहतो दिवसा काठी,
रात्र जागतो तुझ्याच साठी,
नाते अपुले युगायुगांचे,
जसे भ्रमर अन कळ्या फुलांचे,
गुंजन करतो अन मोहवितो,
पराग चुंबून मधुकण टिपतो,
नाते अपुले युगायुगांचे,
जोवर आहे त्रिभुवन सारे,
चिरंतन हे राहील सारे,
त्यात आपुली प्रीत सख्या रे,