फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
9.9K
सप्तरंग त्या इंद्रधनुचे वेड्या मनाला मोहविते ।
इंद्रधनुचे रंग लेऊनि फुलपाखरू भिरभिरते ।।
अशक्य वाटे माणसाला इंद्रधनू धरणे हाती ।
पूर्ण कराया आस मनाची फुलपाखरू धरू बघती ।।
हाती न येते फुलपाखरू अलगद निसटोनिया जाते ।
स्पर्श रेशमी हातावरती क्षणभर सोडोनिया जाते ।।
आयुष्याची वाट चालता असाच अनुभव येत असे ।
कधी दिसतसे रात्र काळोखी, मधुर चांदणे कधी दिसे ।।
प्रसन्न करती क्षण सुखाचे, दुःख परी चटके देते।
क्षणभंगुर हे जीवन तरीही वेड्या मनाला मोहविते।।