गणेश अभंग...!
गणेश अभंग...!
श्री गजानन नाम। तुला हे शोभले
परिचित झाले।विनायक।।
अष्ट ग्रामी अभा। तुझी रे फाकली।
विविध दिसली। तुझी रूपे।
गवसले तिथे। वास्तव्य वसले।
निर्मळ दिसले ।गजानन।।
पेशवे आधार ।झाला जीर्णोद्धार ।
सजले आवार । लगोलग ।।
नामास साजेसे ।घेतले हे रूप ।
दाविले स्वरूप । गजानन।।
श्रीमयुरेश्वर ।मोरगाव गावी।
मूर्ती ही शोभावी। गोडरूप ।।
सिद्ध टेक ग्रामी ।सिद्धिविनायक।
शोभे हा नायक । गावोगावी ।।
बल्लाळेश्वर हा ।पालि त वसला ।
गोजीरा दिसला । भक्ताचिया।।
वरदविनायक । बाळ हर लहान।
तरीही महान। महाडात।।
चिंतामणी वसे । पुण्याचा शेजार।
नाव हे थेऊर । शोभिवन्त ।।
गिरिजात्मक ते । लेण्याद्री निवासी।
धावती प्रवासी।दर्शनास ।।
विघ्नेश्वर बाप्पा। ओझर गावात।
गोंडस रुपात।विराजले।।
महागणपती। रांजण गावात ।
सदा दिमाखात ।रहातसे।।
असा विनायक । आठ गावी झाक।
हे अष्टविनायक ।सुप्रसिद्ध ।।
नमन तयाला । मनोभावे करू ।
श्रद्धा मनी धरू । आशीर्वादा ।।
कृपा याची होता। विघ्न जाते दूर ।
जीवनात सूर। देवोनिया ।।
।।श्री गजनन प्रसन्न ।।