अंकूर
अंकूर
फुले अश्रुंची होतांना
बांध फुटला मनाचा
कधी लाभेल ओलावा
तुझ्या शीतल प्रेमाचा
झुरे मन माझे सारे
सखे तुझ्याच गं साठी
हृदयातून येई गाणी
गोड माझ्याच गं ओठी
असे कसे हृदय तुझे
नाही द्रवत अजून
प्रिये अशाने जाईल
प्रेम अंकूर सुकून
किती सतावसी आता
नको पाहू अंत असा
तुझ्यासाठी सखे माझा
जीव झाला वेडापिसा