Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

तुमचं आमचं सेम असत

तुमचं आमचं सेम असत

1 min
7.2K


तुमच्या लेखी लग्न म्हणजे

पवित्र संस्कार , आई वडील ठरवणार

आमच्या लेखी लग्न म्हणजे दोन जीवांचं   

मनाच मधुर मिलन...,त्याग समर्पण

        बाकी प्रेम हे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत

भावनांचं आक्रंदन , शास्त्र जणू संमोहन

आम्ही भावनांत वहावत जातो , तुम्ही  बी प्रॅक्टिकल

आम्ही मनालाच खात बसतो , तुम्ही लवकर सावरता

तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेता ,आम्ही प्रेमभंगांन कोसळतो 

             बाकी प्रेम हे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत

तुमचं प्रेम मनातल्या मनात , आमची चर्चा पसरते गावभर

तुमचं प्रेम हातचं राखून , आमचं मात्र सारं जगणं उधळून

तुम्ही क्षणात रंग बदलता , आम्ही मात्र दिल्या शब्दाला जागतो

अन तुम्ही कुठेही असला तरी सुखी जीवनाचंच वरदान मागतो 

              बाकी प्रेम हे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance