Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Abasaheb Mhaske

Tragedy

2  

Abasaheb Mhaske

Tragedy

तिला कोण देणार ?

तिला कोण देणार ?

1 min
7.2K


ती मागत होती रोजच लाचार भीक 

अन तिच्या पदरी पडत होते तिरस्कार, द्वेष, अवहेलना 

तिचा निपचित, निष्प्राण देह पाहून कुणीतरी म्हणाल, 

अरेरे बिचारी थंडीनं गारठून मेली, सुटली बिचारी एकदाची

दवा पाणी वेळेवर झाल असत तर ...कदाचित 

ती वाचली असती अस कोणीतरी म्हणाल

 तेव्हा ...मी स्तब्ध होऊन दगड झालो क्षणभर  

खरंच देव कुणाचा किती अंत पाहतो

कळत नाही का कुणास ठाऊक? 

मेल्यावरच  का माणूस मोठा होतो 

त्याची किंमत तेव्हांच कळते 

जेव्हा आपल्यातून निघून जातो  

ती रोजच मरत होती मनातल्या मनात

गेली ती आज अचानक ..

सुटली बिचारी तीळ तीळ मरण्यापेक्षा

सुटली एकदाची कायमची नारकयातनांतून

तिच्या जाण्यानं कुणाला काय फरक पडणार होता?

सिमेंटच्या जंगलात माणुसकी हरवलेल्या जनावरात 

तिला कुठून मिळणार होता अन , वस्त्र , निवारा ...

जाणून बुजून भिकारीण ती, तिला कोण देणार प्रेम, सहानुभूती, आसरा 


Rate this content
Log in