।। मन पाखरू ।।
।। मन पाखरू ।।
1 min
1.9K
मन पाखरू होऊन, रुंजी घालते मनात।
मन रिझविण्यासाठी, प्रित फुलते मनात।।
पडे पाऊस कधीच, हिरव्यागार रानात।
गर्भात प्रीत आता, गाईल मना मनात।।
असा प्रेमाचा फुलोरा, उधळीत प्रीत यावी।
प्रेम प्रीतीच्या भरात, फुलबाग फुलवावी।।
ओल्या चिंब पावसाने, कशी जागवली ही प्रीत।
बीज अंकुरण्यासाठी , मनी आसवली प्रीत।