बंदिस्त मी
बंदिस्त मी
1 min
13.2K
बंदिस्त का अजूनही आहे युगे युगे मी
स्वातंत्र्य प्राप्त तरीही स्वतंत्र का नसे मी
वित्तास प्राप्त करण्या ओलांडला मी उंबरा
सुटला अजून नाही चूल, मूल, हा पसारा
खांद्यास लावूनि खांदा पुरुषासवे मी श्रमते
नारी म्हणून तरीही संसारी मी अडकते
सय माहेराची येता वाटे उडून जावे
वात्सल्य आड येते पाऊल अडखळावे
माता, बहीण, भार्या, कन्याही मीच असता
मज पाहूनि नरहो, वासनांध का हो बनता