Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

आधुनिक गाव

आधुनिक गाव

1 min
449


विविधतेने नटलेली

भारतातली छोटी छोटी गावं

जपतात आप-आपली परंपरा

देऊन मोठ्यांना मान

तर कधी

आधुनिकतेच्या नावाखाली

झिडकारून देतात 

न पटलेल्या परंपरा..


प्रत्येक गावातल्या

जाती धर्माच्या

घराणे घराण्यांच्या

रीती-रिवाज, संस्कृती न्यार्या 

तरीही जपतात पारंपारीक संस्कृतीचे लेणे

तिन्ही त्रिकाळ...


आता आधुनिकतेचे वारे ही

जोमाने वाहतात गावाकडे

त्यात गोंधळुन जोतो आमचा 'साधा माणूस'

आणि झुंझतोय स्वतःशी तग धरून राहण्यासाठी...


ग्लोबलायझेशन च्या नावाखाली जुनी गाव ओसाड पडतात...

तर...

नविन आधुनिक गाव तयार होतात

घेऊन एकच ध्यास

जपण्या भारतीय परंपरा व संस्कृती!!!


Rate this content
Log in