Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
अभंग रचना
अभंग रचना
★★★★★

© Vijay Sanap

Others

1 Minutes   190    5


Content Ranking

हरी कीर्तनाची । जुनी परंपरा

करती साजरा । सात दिस ।।


देश संस्कृती । ठेवावी जपून

देऊ मान पान । वडिलांना ।।


संताची ही भूमी । ज्ञाना तुकोबाची

माझ्या विठोबाची । पंढरी ती ।।


तुळशीची माळ । खांद्यावर विना

हरी नाम म्हणा । सदा मुखी ।।


परंपरा चाले । पंढरीची वारी

चंद्रभागे तिरी । करे स्नान ।।


नामा पायरीशी । करुन भजन

राऊळी पूजन । विठोबाचे ।।


कृष्ण देव माझा । गोकूळचा वेडा

मारूनिया खडा । माठ फोडी ।।


जपा परंपरा । वडिल धाऱ्यांची

संगत खऱ्यांची । करा सदा ।।


संत वारकरी परंपरा

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..