Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Trupti Naware

Others

3  

Trupti Naware

Others

माझे बालपण

माझे बालपण

1 min
342


जेव्हा मी लहान होते

मला मोठ्ठे व्हायचे होते

छोट्या छोट्या गोष्टींमधे

सुंदर विश्व दिसत होते

निरागस, चँचल, अबोल होते

सारीपाटाच्या खेळाची राणी होते

मोठ्या भावंडांची लाडकी होते

आता आठवलं बालपण की,

डोळ्यात पाणी येते...

पिंपळपानाची जाळी बनवुन

पुस्तकात ठेवत होते

मोरपिसाची काडी चेहऱ्यावर

फिरवत होते

पहील्या बाकासाठी मैञीणीशी

झगडत होते

ती जवळ बसावी म्हणून

तिलाच मनवत होते

पहीला बाक मिळायचा आपसूकच

कारण मी ठेंगणी होते

ईंग्रजीच्या तासाची मी

दिवाणी होते

रंगांची,गाण्याची ,कवितेची

फन होते

घरकाम आवडत नव्हते

अभ्यासात मन रमत नव्हते

कारण ,मुळातच मी

हुशार होते...

बाबांनी एकुलती लेक

म्हणून हट्ट सारे पुरवले

पण बंधन असावं हृदयाला

हे डोळ्याँनीच शिकवले ..

शिस्त ,संस्कार ,मर्यादा

बालीशता,निरागसता,मुर्खपणा

हेच जग फार छान होते

आता...जबाबदारी ने

नाती जोडत होते

मनस्तापाला वजा करून

आनंद शोधत होते

तडजोडीशी मैत्री करून

प्रपंच सजवत होते

मी मोठी झाले तेव्हा

मला लहान व्हायचे होते

काही राहुन गेले जगायचे

काय..ते कळत नव्हते

बालपणीचे सुंदर दिवस

फक्त आठवायचे होते

कारण ..आता ते दिवस

परत येणार नव्हते !!!!


Rate this content
Log in