Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

1  

Abasaheb Mhaske

Romance

ऋणानुबंध

ऋणानुबंध

1 min
2.0K


अचानक तू भेटलीस , आवडलीस..माझी झालीस...

विचार पटले ,मने जुळली नसताना कसले ऋणानुबंध

स्वप्नवत होत सगळं ... मी म्हणजे एक वादळ होतो

प्रत्येकवेळी सावरलं घरटं आपलं कारण तू होतीस ..

 .

तसं तुझं नि माझ..,नव्हतं कसलं नातं

तरीही वाटते नाते हे जन्म जन्मांतरीचे ...

सूर जुळत गेले तसे जवळ -जवळ आलो  

कळलंही नाही दोघांना एकरूप कधी झालो

 

आयुष्याच्या निसरड्या वळणावर ...

कैकदा फाटले आभाळ , तारे सारे निखळले ...

सावरलोही कारण तू तोल ढळू दिला नाहीस म्हणून 

खंबीरपणे उभी राहिलीस पाठीशी अर्धांगिनी बनून ...

तू आलीस जीवनात नि आयुष्यच सारे बदलले

तूच भरलेस रंग तेव्हा... अंगण माझे बहरले ..

दिव्यापरी जळत राहून तूच घर प्रकाशमान केलं

मी होतो सोबतीला पण ...तूच घर उभं केलं ...

मुलं - बाळ घर संसार ,सुख दुःख सारं सारं ...

तूच सारं सांभाळून घेतलं म्हणून इथवर आलो

तुझ्याशिवाय अस्तित्वच नाही मज जीवना...   

असाच शेवट गोड व्हावा... ईश्वरचरणी प्रार्थना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance