हे विश्व तुझे माझे
हे विश्व तुझे माझे
हे जग तुझे माझे...
तुझ्या माझ्या या जगात,
इटुकला आहे देश,
हा देश तुझा माझा
इटुकल्या या देशात,
पुटुकले आहे गाव,
हे गाव तुझे माझे
पुटुकल्या या गावात,
इवलेसे आहे घर,
हे घर तुझे माझे,
इवल्याश्या या घरात,
भातुकलीचा ग संसार,
संसार तुझा माझा
भातुकुलीच्या या संसारी,
लुटुपुटूची भांडणे,
भांडणे तुझी माझी
लुटूपुटुच्या भांडणी,
थोडा रुसवा फुगवा,
या रुसव्या फुगव्यामध्ये,
आहे थोडी गोडी गुलाबी
माझ्या ओठांच्या गोडीने,
तुझे होती गाल गुलाबी
असे छोटेसे हे विश्व,
हे विश्व तुझे माझे,
हे विश्वच गोड गुलाबी