Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shila Ambhure

Others

3  

Shila Ambhure

Others

सायकल वारी

सायकल वारी

1 min
13.6K



बाप जरी मी अडाणी

शिका तुम्ही लेकरांनो.

कष्ट माझे तुम्हासाठी

ठेवा जाणीव पोरांनो.


शिकवुनी शाळा तुम्हा

बडा साहेब करीन.

स्वप्न माझे अधूरेच

डोळा तुमच्या पाहीन.


असो ऊन वारा पाणी

पोचवेन रे वेळेला.

काम माझे नेहमीचे

आधी महत्त्व शाळेला.


जरी असलो गरीब

कष्ट करतो अपार.

कोसळत्या पावसात

नाही घेणार माघार.


लाड कौतुक तुमचे

करणार मी बाळांनो.

हट्ट होतीलच पुरे

धीर धरा रे बाळांनो.


नसे चारचाकी जरी

सायकल माझी भारी.

नाही लागत इंधन

प्रवासात मज तारी.


मेणकापडाची छत्री

आहे तुम्हा शिरावरी.

करू नकाच काळजी

जाऊ बघा वेळेवरी.


Rate this content
Log in