Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Inspirational

4  

Prashant Kadam

Inspirational

बकरा !!

बकरा !!

1 min
14K


असो निवडणूकांचे विश्लेषण,

वा असो नेत्यांचे संभाषण,


असो आरक्षणा वरील वाद,

वा पक्षीय सर्वेक्षणावर संवाद,


उगाचच आपापसात वाद, घालू नका

एकमेकां बद्दल मनात राग, ठेवू नका


राजनितीचे फालतू बळी, नका पडू

नेत्यांना ऊगाचच दैवतं, नका बनवू


आंधळा विश्वास, कधीच नका ठेवू

मनाचा तोल, संयम, नका देवू ढळू


मित्र,मैत्रीणीं सोबत, नाहक नका भांडू

आप्त स्वकीयांशी, नाते नका तोडू


राजकारणी काय, कधीही एक होतील

आपापसातील वाद, सहज संपवतील


पुन्हा गळ्यात गळे, घालून मिरवतील

चहा, भोजन पार्टीत, मस्त हादडतील


थूकी या वरून, त्या बोटावर करतील

अगदी अलगद पणे, पलटी मारतील


गळा भेटीत पार्टी, देखील बदलतील

विरोधकांच्या लग्नातही, हजर होतील


तुम्ही आम्ही मित्र मात्र, फक्त वैरी होवू

डोक्यात कायमचाच, राग ठेवून राहू


एकमेकांपासून खरेच, खूप दूर जावू

नाते संबंध ही आपले, तोडून टाकू


मित्रत्वाला ही सहज, काळीमा फासू

एकमेकांना नजरे पासूनही, दूर करू


वाद विवादात नाहक, भांडत बसू

राजकारण्यांचा फक्त ‘ बकरा’ बनू


आता तरी आपण, शहाणे बनावे

वाद विवादा पासून, अलिप्त असावे


राजकारणी, पुढाऱ्यांपासून दूर रहावे

‘बकरा’ न बनतां, शहाणपण शिकवावे


चिथावणीखोर पुढाऱ्यांपासुन, सावध होवू

देश ऐक्याचाच प्रामुख्याने, विचार करू


जनते मुळे, जनते साठीच, नेते असतात

देश ऐक्य तोडण्यासाठी, नेते नसतात


जाणीव याची, नेत्यांना करून देवूया

देशासाठी आधी, चांगले नेते घडवूया


स्वार्थी नेत्यांना कायमची ‘अद्दल’ घडवूया

‘बकरा’ न बनता सुजाण नागरीक बनुया !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational