Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Varsha Chopdar

Others

3  

Varsha Chopdar

Others

बाप

बाप

1 min
289


आई घालते जन्माला 

प्राण लावूनी पणाला 

बाप करतो रक्षण

भीत नाही कोणाला 


दिसे यातना कठीण 

होई आईच आधार

कळे न विदीर्ण मन

होई बापाचा उद्धार 


करी बाळ पराक्रम 

जाई आईच्या कुशीत 

बाप आणतो मिठाई 

तरी नसतो मिठीत 


येई छोटी अडचण 

राही आठवत आई

येई मोठाले संकट

बाप ओठांवर येई


करी रात्रीचा दिवस 

देई पोटास भाकर

मुखी हास्य फुलवाया

होई लोकांचा चाकर


माया, ममता, करूणा

साठा हा अंतरंगात 

करू वंदन बापाला

जाण ठेवूनी जीवनात 


Rate this content
Log in