Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

*स्वप्नातील शाळा*

*स्वप्नातील शाळा*

1 min
18.3K



स्वप्नातील माझी शाळा

झाडाखाली मित्र झाले गोळा

मित्र माझे चतूर

खोडकर न खेळकर

पाटी,पेन्सील, पुस्तक,वही

हाती यातील काही नाही

इथे आहे निसर्गातून

शिक्षण सर्व काही

निसर्ग हा आमचा गुरू

अभ्यास झाला आमचा सुरू


झाडे,वेली,फुले,पाने

पृथ्वी सुंदर हिरवीगार

निसर्गातील पाहतोय चमत्कार

पाऊस पडतोय धडाडधूम

वीज लकाकते कडकडून

पाहतोय हे डोळा भरभरून

शिकतोय आम्ही निसर्गातून


पशू,पक्षी सर्व होती गोळा

निरीक्षण त्यांचे करतोय डोळा

निसर्ग आमचा आहे साथी

महान ध्येये घेवू हाथी

स्वप्नातूनी मी जागी झाली


हे स्वप्न कीती सुंदर

माझ्या मनाचा झालाय बंदर

चला उठा लागा तयारीला

जाण्या ज्ञानमंदिराला

माझ्या लाडक्या बाईंना भेटायला

त्यांच्या कडून कौतुक करून घ्यायला


Rate this content
Log in