थोडे हसूया
थोडे हसूया
1 min
402
चिंता,दुःख,ताण सारे विसरूया
रोज घडीभर खोखोखो हसूया।।धृ।।
करुनिया कसरत
तंदुरुस्त करू तन
शरीर जर सुदृढ
निरोगी राहिल मन
शुद्ध हवेसाठी पहाटे उठूया।।1।।
फुलांचे आयुष्य थोडे
तरी होती ना उदास
रंग गंध देती नाना
सुख देती इतरास
नको रडगाणी आनंदे गाऊया।।2।।
कधी चाखू बर्फगोळा
कधी इमली खट्टी
मैदानात खेळ खेळू
खोटी खोटी करू कट्टी
विसरुनि वय लहान होऊया।।3।।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एक रचना माझी
शीला अम्भुरे बिनगे
(साद)
परतुर, जालना