फुलपाखरू
फुलपाखरू
1 min
225
एकदा माझ्या अंगणात फुलपाखरू दिसले
त्याला पाहताच मी आनंदून गेले
रंगीबेरंगी पंख होते छान छान
गिरक्या घेताना सुंदर दिसत होते ध्यान
इवलेसे , छोटेसे भिरभिरत होते सगळीकडे
पकडायला गेले की पळत होते दुसरीकडे
पकडापकडीचा खेळ आता रंगला
वयाचे भान विसरून जीव गुंतला
किती वेळ झाला कुणास ठाऊक
नजरेआड होताच मन झाले भावुक
रात्री काही नीज येईना
ते डोळ्यासमोरूनच जाईना