काव्यांजली
काव्यांजली
1 min
145
.निरोप वर्षाला
निरोप वर्षाला
देण्या सुखरूप उरलो
सुकृत्याला भेटलो
आयुष्यात ....1
निरोप वर्षाला
सुख: दुखा:ची झळ
सामंजस्याचे बळ
एकवटूनी .....2
निरोप वर्षाला
मी-पणाला द्या तिलांजली
मतभेदाची बली
राष्ट्राला .....3
सेवा निरंतर
करण्या शपथ घेवू
सुआचरण ठेवू
हृदयात ....4
निरोप वर्षाला
हसत मुखाने देवू
चांगले आठवू
आनंदाने.....5