Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

सायकल स्वारी

सायकल स्वारी

1 min
9.5K


गरीबाच्या संसाराला

सायकल देई साथ

तीच असे जीवनाचा

अनमोल असा रथ


दोघे राजा राणी फिरे

सायकल स्वारी मस्त

झाले महाग पेट्रोल

तरी प्रवास हा स्वस्त


नको रक्षणाचा खर्च

होतो व्यायाम तनूचा

नसे तमा आरोग्याची

घाम गळे शरीराचा


राजा राणी दोघेजण

जाती प्रेमे बाजाराला

आनंदाने ताजा ताजा

घेई तेथे भाजीपाला


मना वाटे तेव्हा निघू

वाट नको पाहायला

सायकल रथाचा या

मोठा आधार जीवाला


गरिबीत जगण्यास

सायकल संगतीला

राजा राणीचा संसार

श्रीमंतांच्या पंगतीला


Rate this content
Log in