Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
मी परत येईन
मी परत येईन
★★★★★

© Varsha Chopdar

Others

1 Minutes   14.0K    13


Content Ranking

(काव्य प्रकार - मुक्तछंद)

काय झालं ???

अचानक काळजाचा चुकला ठोका -------

युद्ध झाले चालू , जवान रणांगणावर निघाला

तो आत्मविश्वासाने बोलला

काळजी करू नका कोणी

मी परत येईन --------


आई बाबांच्या जीवाची झाली घालमेल

बायकोच्या डोळ्याला लागला पदर

पोर लागली चेहर्‍याकडे बघू

जवानाने सावरले स्वत:ला

आणि म्हणाला मी परत येईन ----


आई- वडिलांना द्यायला आधार

पत्नीचे कुंकू ठेवायला अक्षय

बहिणीकडून बांधून घ्यायला राखी

पोरांचे करायला लाड

मी परत येईन --------


धर्म, पंथ, जात मानत नाही

मानतो फक्त मातृभूमीचे ऋण

पांग फेडण्याची मिळाली आहे संधी

त्या संधीचे सोने करून

मी परत येईन -------


ऊन ,वारा,पाऊस यांची नाही तमा

शत्रूने कितीही रचो मनसुबे

कितीही असो ताफा

मोहिम करतो फत्तेच

मी परत येईन ------


येतील कानावर अनेक वार्ता

येतील आवाज तोफा आणि बंदुकीचे

पण घाबरू नका, काळजी करू नका

शत्रूला घालून कंठस्नान

लवकरच मिळेल आनंदवार्ता

नक्की मी परत येईन --------

युद्ध जवान रणांगण शत्रू मातृभूमीचे ऋण

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..