धर्म मानवता ( अभंग रचना )
धर्म मानवता ( अभंग रचना )
रंगांची दुनिया | आहे निराळीच ।
जोड धर्माचीच I दयावीच का ? ॥ १ ॥
हा रंग तुझा रे । हा रंग माझा रे I
आणि रक्ताला रे । लाल रंग ॥ २ ॥
वेगळे वेगळे । फुट ती पाडती ।
मजा ही पाहती । पाखंडीच ॥ ३ ॥
सर्व त्या धर्मांना । दिली समानता ।
संविधान आता । अंगीकारा ॥ ४ ॥
धर्म मानवता । शिकवण देतो |
एकत्र नांदतो । बंधुभाव ॥ ५ ॥