Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Swati Damari-Masurkar

Others

4.5  

Swati Damari-Masurkar

Others

रवी प्रवेशिता अंबरी......

रवी प्रवेशिता अंबरी......

1 min
2.5K


व्योम अंगणी रंग पंचमी कोण करी साजिरी

कुणी उधळली दाही दिशा ही लाली हो अंबरी।।


निलमंडप का सजविला लावूनी भरजरी झालरी

कुणी रेखीली अतीव नक्षी या सुवर्ण स्तंभावरी।।


द्विजगण हे मधुर गायन का करिती तरुवरी

प्रभात समयी कोकिळा ही का गाई पंचम स्वरी।।


दिशांदिशांमद्ये दरवळे का ही सुगंधमय कस्तुरी

कुणी घेऊनी गुलाबदाणी जलसिंचन हे करी।।


पहा चालल्या नटूनी ललना आरती घेऊनी करी

दीपतेज अलौकिक हे कुणी पसरवी भूवरी।।


सहस्त्रकिरणे रवी प्रवेशे आपुल्या हो मंदिरी

काय तयाच्या स्वागताचा थाटमाट तो पहा तरी।।


नेत्र दिपती त्या तेजाने प्रकाशली अवनी सारी

प्रसन्न झाले जगत सारे रवी प्रवेशिता अंबरी ।।



Rate this content
Log in