शिक्षक- ज्ञानाचा झरा
शिक्षक- ज्ञानाचा झरा
जीवनाचा पथदर्शक शिक्षक हा असे खरा
गुरू संस्कारदाता ज्ञानाचा वाहता झरा।।१।।
जीवना आकार देतो मूर्ती छान घडवितो
कुशल कारागीर हा कष्ट खूप उचलतो।।२।।
नाही परीस गुरू शिष्याला गुरू बनवतो
ज्ञानामृत पाजितो नि नवसंजीवनी देतो।।३।।
शिक्षक नाही थकत कधी ज्ञानदान करतांना
आनंद त्यास वाटे सदा मुलांना शिकवतांना।।४।।
जीवनाचा खरा अर्थ शिक्षकामुळे कळावा
आई नंतर मान पहिला गुरूलाच मिळावा।।५।।