Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

4.2  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Inspirational

गगनामधले तारे

गगनामधले तारे

1 min
14.1K


आकाशाला घालू गवसणी, मिळुनिया सारे

चला मित्रहो आणूया, गगनामधले तारे          || ध्रु.||


नवा जोश अन नव्या दमाने, लागू कामाला

पिकवू समृद्धीचे मळे, वाहू दया घामाला

आता क्षणिकही विश्रांतीस्तव, थांबू नका रे

चला मित्रहो आणूया, गगनामधले तारे          ||१||


नवी ध्येये,अन नवी क्षितिजे, गाठायासाठी

सर्व जगाला सुख समृद्धी, वाटायासाठी

उघडून टाका आता, ही बंद मनाची दारे

चला मित्रहो आणूया, गगनामधले तारे          ||२||


हेवेदावे अन फुटीला, तिलांजली देऊ

मिळून हाती एकतेची, मशाल ही घेऊ

घुमू द्या दशदिशांमधूनी, समतेचे वारे

चला मित्रहो आणूया, गगनामधले तारे     ||३||

  

शूद्र विचारांची आता, करुन टाकू होळी

विश्वनागरिक होण्याची, आता आली पाळी

अखंड मानवजातीचे, कल्याण करुया रे

चला मित्रहो आणूया, गगनामधले तारे     ||४||


मिळून करू निर्माण आपण विश्व नवे

मिळेल तेथे सर्व काही ज्याला जे-जे हवे

करू घोषणा नवीन आता नवीन द्या नारे

चला मित्रहो आणूया, गगनामधले तारे     ||५|| 

    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational