तुझ्या अबोल मनातून
तुझ्या अबोल मनातून
1 min
417
तुझ्या अबोल मनातून
दुःख हे सांडते
व्यथा गहिवरल्या जीवनाची
उदास नजरेत मांडते
तुझ्या अबोल मनातून
उमटते ही साद
सामावते अंतरीचा आक्रोश
अन प्रियाची याद
तुझ्या अबोल मनातुन
आसवे ही गळतात
प्रेम करावया जाता पुन्हा
माघारी पावले वळतात