धरेचा साज
धरेचा साज
1 min
349
आकाशी हे दाटले
ढग काळेकाळे
कडकडले
विज धावे
तांडव
बघे
भू
रिमझिम पाउस
काळेभोर ढग
झिम्मड वारा
लेवूनिया
सरी या
आल्या
ग
सजली ही धरणी
साज हा चढला
शालू हिरवा
माथ्यावरी
चंदेरी
मेघ
हे
रंग छटा निराळ्या
सुमने रंगीत
पर्ण हिरवे
अंकुरले
नविन
बिज
ग