जी तिचीच हळवी सत्ता
जी तिचीच हळवी सत्ता
1 min
7.1K
ती हसते जेव्हा केव्हा
मी हसतो कामापुरता
ती बसते होऊन पदर
मी उरतो शब्दांपुरता...
मी जातो शरण झोपेला
टेकवत हलका माथा
ती राहते घालत वारा
हलवत काळीज-भाता...
पोटामधूनी पहाडी
ओठाळ वाहता गाणे
गाठीला बांधून देते
रानाची हिरवी पाने...
ती श्वासांना धरत कोंडून
येते होऊन कविता
मी टाळून टळत नाही
जी तिचीच हळवी सत्ता...