Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Murali

Others

4  

Smita Murali

Others

पाणी आपले जीवन

पाणी आपले जीवन

1 min
305


पाणी जीवन सजीवांचे

पाणी असे अमृततुल्य 

थेंब थेंब पाण्याचा किमती

पाण्याचे जाणा वेळीच मुल्य


पिण्यायोग्य पाणी असे मर्यादित

करा बचत मिळणाऱ्या पाण्याची 

काटकसरीचे अवलंबावे तंत्र

गुरुकिल्ली असे ही जीवनाची


गोष्टीतला हुशार कावळा म्हणे

तहान भागवी माठात टाकून खडे

आज माठात नसे थेंबभर पाणी

कावळ्याचे प्रयत्नही पडले तोकडे


कावळ्यासम होईल आपलीही गत

पाणीसाठा जाईल जेंव्हा संपून

डोळ्यापुढे आजच आठवू भविष्य 

पाण्याचा वापर करु चला जपून


घरदार, शेतीवाडी वारसांना ठेवूच

सोबत पाणी, हवा, निसर्गही ठेवू

मोफत मिळालेली ही निसर्गभेट 

चला वारसांना प्रयत्नपूर्वक देवू


चला तर मग आजच लागू कामाला

सारे मिळू, पाणी अडवू, पाणी जिरवू 

पाण्याच्या थेंबा थेंबावर हक्क सजीवाचा

हा संस्कार बालपणीच मनामनांवर रुजवू!!!!



Rate this content
Log in