Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Tragedy

1.7  

Abasaheb Mhaske

Tragedy

ह्या स्वप्नांचं मी काय करू ?

ह्या स्वप्नांचं मी काय करू ?

1 min
268


ह्या स्वप्नांचं मी काय करू ?

दिनरात छळतात , पळतात ...

ओघळतात अलगद वेळी- अवेळी

पुरतही नाही अन सरतही नाही 


ह्या स्वप्नांचं मी काय करू ?

एक ना धड भराभर चिंध्या ...

जगण्यास आधार देतात तर कधी

सावली बनून सोबत करतात ...


ह्या स्वप्नांचं मी काय करू ?

त्यांनी न पोट भरत ना मन ...

रडवतात तर कधी मन प्रसन्न

असून अडचण नसून खोळंबा



ह्या स्वप्नांचं मी काय करू ?

पिच्छा सोडत नाही सहसा  

 पण ... पूर्ततेकडे चालताना

हमखास देतात मज दगा


ह्या स्वप्नांचं मी काय करू ?

विरह जसा प्रेमीयुगलांचा ....

मी ही सैरभैर .हतबल ,.हताश

परंतु ध्यास मात्र निरंतर ,अनिवार



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy