Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pooja Yadavrao Bhange

Inspirational

5.0  

Pooja Yadavrao Bhange

Inspirational

"मनातल्या मनात".....!

"मनातल्या मनात".....!

1 min
552



कधी वाटते डॉक्टर व्हावं ,

आजारांना बरे करावं .

पण ........

असेच काहीतरी वाटतेय मनात ,

दूसरचं काहीतरी व्हायचंय मला.

हो !!!

असेच काहीतरी वाटतेय मनात

‌‌‌‌‌‌‌खास काहीतरी व्हायचंय मला !




कधी वाटते सैनिक व्हावं ,

‌ सीमेवरती युद्ध लढावं.

पण ..‌...‌‌...

‌‌‌ ‌‌‌ असेच विचार येतात मनात ,

विशेष काहीतरी व्हायचंय मला!



कधी वाटते वकील व्हावं,

सत्याचाच साथ देवून,

अन्यायावर मात करावं .

पण ........

असेच काहीतरी वाटतेय मनात,

अन् दुसरंच काहीतरी व्हायचंय मला !



‌‌‌

‌‌. कधी वाटते शिक्षिका व्हावं ,

ज्ञान - अमृताचे रोपटं लावावं ,

अन् साक्षरतेचं राज्य घडवावं . पण .....

‌असेच काहीतरी वाटतेय मनात ,

वेगळंच काहीतरी व्हायचंय मला!



कधी वाटते शास्त्रज्ञ व्हावं ,

एकाग्रतेने शोध घ्यावं ,

अन् शास्त्रज्ञाचं पद कमवावं .

पण ..

असेच काहीतरी वाटतेय मनात ,

मला स्पेशल काहीतरी व्हायचंय जगात !



‌ ‌ कधी वाटते गृहिणी व्हावं ,

आई-वडिलांंनचे नाव गाजवावं .

‌‌‌ अनेक विचार फिरताना डोक्यात ,

असेच वाटतंय मनातल्या मनात !!!


Rate this content
Log in