तुझ्याविना
तुझ्याविना
1 min
505
तुझ्याविना तुझ्याविना
मन माझे लागेना
सूर जुळले जुळल्या तारा
पण तारांची वीण जुळेना
तुझ्याविना तुझ्याविना
मन माझे लागेना
भरकटलेल्या मनाला
आसरा मिळेना
तुझ्याविना तुझ्याविना
मन माझे लागेना
एकांताच्या शोधात मी
वाट दिसेना
तुझ्याविना तुझ्याविना
मन माझे लागेना
हुरहुरल्या मनाचे
काहूर मिटेना
तुझ्यविना तुझ्याविना
मन माझे लागेना