Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Others

3  

Abasaheb Mhaske

Others

आता कशाला जगू ?

आता कशाला जगू ?

1 min
335


आई - बाबा मी आता 

जगून तरी काय करू?

सारं काही संपलंय...

नका तुम्ही रडू...


वाटलं होतं मी बहरेन

तुझ्या दारी पाठवणी

कराल तुम्ही माझी  

साश्रू नयनांनी तेव्हा...


मी रडेन धाय मोकलून 

तुमच्या कुशीत शिरून 

भाऊ माझा सोडेन मला...

सोहळा तो पाहीन डोळे भरून 


सांग ना गं आई माझं काय चुकलं?

तू म्हणत होतीस तूच माझा दुसरा मुलगाच 

पण नाही गं स्त्री कितीही शिकली तरी...

पुरुषाच्या हातचं बाहूलच, उपभोग्य वस्तूच 


बाबा मी गेल्याने खचून जाऊ नका 

खूप केलं तुम्ही माझ्यासाठी मुलगा मानून 

शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं...

दादाला शिकवा त्याच्यातच मला शोध आता 


बाबा मला खरंच जगायचं होतं मनासारखं 

बरंच काही करून दाखवायचं होतं खंबीर बनून 

किती - किती स्वप्न रंगवली होती मी म्हणून सांगू 

पण एका क्षणात सारे उद्ध्वस्त झाले, आता कशाला जगू?


Rate this content
Log in