भाषिक कोडे
भाषिक कोडे
1 min
13.7K
रंगाने काळा मी
शाळेत असतो.
विद्यार्थी नसून
वर्गात बसतो.
सर नि बाईंचा
मीच खास मित्र.
माझ्या साथीला
शब्द नि चित्र,
रंगीबेरंगी व
खडू हे पांढरे.
रंगवती माझे
अंग अंग सारे.
आयतासारखा
आहे कोण मी?
नाव आता माझे
सांगता का तुम्ही?