कविता
कविता
तू जाताना आठवणींचे
अत्तर देवून जा...
विरह दरवळेल त्यात
असा गंध पसरवून जा...
तू जखमेचे व्रण दुखरे
अलंकार बनवून जा...
हिरे ,मोती , माणिके ,
पाचूसम दागिने मढवून जा ...
तू जपलेले कोंब कोवळे
प्रीतफुल, दगडफूल करुन जा...
उभ्या हिरव्या माळरानावर
तू पर्वतरांग उभारून जा...
कशा पुसाव्या स्मृती सा-या
तू विस्मृतीमय भाव पेरून जा...
विसर पडेल तुझा कायमचा
अशी वर्तवणूक देवून जा...
तरीही उराशीच राहशील
हृदयातील तू दिप बनून जा...
पावित्र्यमय ईश पुजण्याचे
पुण्य प्राप्तीचे योग देवून जा ...