लाडाचा गं धनी
लाडाचा गं धनी
1 min
1.4K
लाडाचा गं धनी महा
दावणी कुणब्याच्या लोळं
रात-दिस काम धंदा
उभ्या उन्हा मधी जळं ____||१||
बांधून पोटाला कासरा
ओढे संसाराचा गाडा
सावकराच्या रिना पायी
धनी महा झाला वेडा -------||२||
सोडून मेखीचे बैल
जुपे जीवाचा नांगर
आस बाधून पोटाला
खाई उभ्यान भाकर-----!!३!!
नाही कधी विसावला
होतं मुलीच लगीनं
नाही पडला पाऊस
कसं आलं हे ईघ्न.......!!४!!
घेनं देनं रखडलं
नाही पहूचला हात
याच हूंडयाच्यारे पायी
झाला मुलीचा रे घात.......!!५!!