Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

सिमेंट पाईप ( अभंग रचना )

सिमेंट पाईप ( अभंग रचना )

1 min
7.0K


सिमेंट पाईप I शिल्लक राहिला ॥

रस्त्याच्या कडेला | एकटाच ॥१॥


मिळण्या निवारा | ताबा तो घेतला ॥

त्यातच थाटला | हा संसार ॥२॥


वन रूम पहा I किचन त्यातच ॥ 

ताट दुरडीत | उघडेच ॥३॥


तीन लेकरांचा I कराया सांभाळ ॥

उसनेच बळ | कुठवर ? ॥४॥


वर लटकती I उघड्याच तारा ॥

आंधळा तो वारा I आयुष्यात ॥५॥


फाटकी चटई | जणू गच्चीवर ॥

शोधते नजर I शून्यातच ॥६॥


भुकेले ते पोट I उखड बसून ॥

धरतो दाबून I पहाटेच ॥७॥


नाही दाना पानी I नाही स्वयंपाक

चावतसे लेक | कुटकेच ॥८॥


कपडे अंगात I धुतले केंव्हा ते ?॥

पावसातच ते I भिजलेले ॥९॥


देश हा माझाच I हक्क माझे सारे ॥

कोण तो नाकारे ? I कळेचना ? ॥१०॥


Rate this content
Log in