Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Inspirational Others

5.0  

Pandit Warade

Inspirational Others

देशभक्तीपर काव्य

देशभक्तीपर काव्य

1 min
7.3K



या भूमीची माती लावू आम्ही अपुल्या माथी ।

या देशाचे रक्षण करण्या सदैव उघडी छाती ।।


प्राणाहूनही प्रिय आम्हाला अमुचा हिंदुस्थान ।

त्याच्यासाठी प्राणाचेही देऊ आम्ही बलिदान ।।


प्रेमाने वागणे, वागवणे ही इथली संस्कृती ।

निभावतो आम्ही प्राणपणाने मित्रत्वाची नाती ।।


देऊ भलेही कासोटीची सोडुनिया लंगोटी ।

नाठाळाचे माथी हाणू वेळप्रसंगी काठी ।।


नापाक इरादे तुझे कधीही होणार नाही साध्य ।

हाणून पाडण्या डाव दुश्मना, आहोत आम्ही सिद्ध ।।


रात्रंदिन रक्षितो देश हा घालून आम्ही लक्ष ।

सावधान दुश्मना रहावे आहोत आम्ही दक्ष ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational