आजही ती तिथेच आहे
आजही ती तिथेच आहे
जग पोहचले मंगळावर
चंद्र तर घरचाच झाला ।
आकाशच सर करतोय आता
जमाना व्हर्चुअलचा आला ।
झपाट्याने पुढे जातोय सारे
काळ जुना इतिहास झाला ।
आचार विचार सारे बदलले
माणुसकीचा तर झाला पाला ।
अजूनही मात्र तू आहे तिथेच
बंधनांचा का तुझ्यावरच घाला ।
हो मुक्त टाक तोडून ही बंधने
चिंता तुझी गं आहे कुणाला ।