Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajesh Sabale

Inspirational

4.9  

Rajesh Sabale

Inspirational

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

1 min
868



तुझ्या माझ्या प्रेमासाठी, रात काजव्यांची फुलं।

अन चंद्र आहे साक्षीला, मन तुझ्या संग बोल।।


रोज रोज येतो राणी, तुझ्या ग भेटीसाठी ।

मनामध्ये झुरतो राणी नाही, होत गाठीभेटी।।

तुझ्या भेटीसाठी मन, आधीर लई ग झालं।

फुलपाखारू होवून मन, तुझ्यापाशी आलं।।


काय तुझा नखरा सखे, रेखीव बाजू बंध।।

नाकी डोळे छान दिस, मन होई बे धुंद ।।

पाठीवरली वेणी तुझी, सापावाणी डूल।।

नाकामधी डुलतात सखे, सोन्याचे ग डूल।।


शितल चंद्रावणी तुझा, गोरापण ग मुखडा।

नाकामधी डोलतोय सखी, नाथीचा आकडा ।।

कमरेला कमर पटा, कंकण सोन्याचे बांधलं।

पायांमधी पैजान सखे, चांदीचे वाजलं।।


काय तुझा डौल सखे, तुझी चाल मोर वाणी।।

चांदण्यात रूप दिस, पौर्णिमेच्या चंद्रावाणी ।।

झुंजू मुंज होता होता, दवबिंदू ग सांडलं।।

पहाटेच्याअंगणात कोणी, मोती चांदणं पेरलं।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational