आठवण तुझी❤️
आठवण तुझी❤️
मनाच्या हळव्या कोपऱ्यात
नेहमी तुला जपल होतं
उदास होणाऱ्या कप्प्यात
कधीच गणल नव्हतं
मनातल्या प्रत्येक इच्छेला
तुझ्या सोबत जोडलं होतं
तू नसलास जवळ
तरी त्यांना मनात कोरलं होतं
आठवणींच्या शिवाराला
सुरेख एक कुंपण होतं
त्याला मात्र
तुझ्या शब्दांचं कुलूप होतं
इतकं सारं असताना
मागणं मात्र काहीच नव्हतं
आयुष्यातल्या गोड क्षणांना
तुझ्याच सोबत जगायचं होतं