Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

5.0  

Pandit Warade

Others

घोटभर पाण्यासाठी

घोटभर पाण्यासाठी

1 min
9.3K


अजूनही देवा तुला येईना कशी कीव।

घोटभर पाण्यासाठी व्याकुळाला जीव ।।धृ।।


इतुका कठोर कसा होशी तू रे जगदिशा।

पाण्यासाठी लेकरांना फिरविशी दाही दिशा।।

ओलांडावी लागतसे गावाची ती शीव ।।१।।


शोध घेतसे पाण्याचा रानोमाळ भटकूनी।

व्याकुळल्या नजरेला कुठं सापडेना पाणी।।

चिल्यापिल्यांसाठी होई कासावीस जीव ।।२।।


करीतसे धावा तुझा पाणी कुठे लपविले।

आता तरी सांग देवा काय आमुचे चुकले।।

सांगितल्या उपायांची ठेऊ जाणीव ।।३।।


भरपूर दिले होते पाणी तुला जीवा।

नाही सांभाळले आता करतोस धावा।।

थेंब थेंब पाणी आता राखून ठेव

कळवळूनि तुला सांगतसे देव।।४।।


भूमातेचे स्तनपान किती करशील।

परतून तिला काही कधी देशील।।

स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ठेव ।।५।।


तुला जागविण्या किती ऋषीमुनी आले।

तुझे कल्याण साधण्या देह झिजविले।।

त्यांच्या उपकाराची तू जाणीव ठेव।

त्यांच्या मुखातून तुला सांगतसे देव।।६।।


Rate this content
Log in