बाप....
बाप....
1 min
14.6K
बाप
बाप लळा बाप मळा
पायी वाळा । बालपणी...
बाप गाणी बाप वाणी
ओल्या रानी । हिरवाई...
बाप नाक बाप हाक
बाप धाक । पावलांचा...
बाप घर बाप दार
बाप हार । गळ्यातला...
बाप झाड बाप ओढ
बाप मेढ । मांडवाची...
बाप प्राण बाप धन
बाप ऋण । अनुदानी...
बाप गेला बाप गेला
आणि झाला । आठवण...