Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

मतदार मन...!

मतदार मन...!

1 min
388



झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

उद्या दिवस आहे बाबा मतदानाचा

लोकशीचा जागर बघ कसा रंगला

जीव मतदारांचाही रे दंगला


स्वार्थासाठी ,परमार्थासाठी सारे पहा

बाही सारून पुढे सरसावले

या उन्हातही प्रचाराने वैतागून

पुरते लोकशाहिसच हो कावले


पाहतो उघड्या डोळ्यांनी

नवे नवे रोज वेगळेच हीन चाळे

कसे फुलतील सांगा विश्वासाचे

यांच्या जीवनी आता यशाचे मळे


तरीही मतदार राजा सुजाण जाणता

गप्प घरी आता बसणार नाही

मतदानाचे पवित्र कार्य तो

केल्यावाचून राहणार नाही


देशासाठी प्रत्येक मतदार

होणार उद्या मनापासून उदार

मतदान करुनि तो आपले कर्तव्य

शंभर टक्के नक्कीच बजावणार...!


असे म्हणता म्हणता

निवडणूक मतदान प्रक्रिया

समाधानाने पार पडली

एकदाची सारी घोडी गंगेत न्हाली


आता योग्य तेच घडणार

सारे नको नको ते पडणार

खंदे पाईक उभारणार

लोकशाही पुन्हा फुलणार....!



Rate this content
Log in