Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

जंगल- पर्यावरण गीत

जंगल- पर्यावरण गीत

1 min
14.2K


जंगल तोडणाऱ्यानो आता तरी सुधरा

नाश पृथ्वीचा रे सारा आता बंद करा

तुमच्यामुळे सारे झाले उजाड संसार

पाण्यावाचून व्याकुळ झाले जीव धरतीवर

जंगलाच्या रक्षणाला आता आधार देऊ या

जीव सृष्टीचे आपण सर्वजण आता वाचवू या

जंगल तोडणाऱ्यानो आता तरी सुधरा

नाश पृथ्वीचा रे सारा आता बंद करा

दुर्मिळ झाडांचे महत्त्व तुम्ही जाणा

जीव तुमचा वाचण्यास धावा रक्षणा

जतन करू या निसर्ग पृथ्वीवर

हेच आहे खरे ऋण या सृष्टीवर

जंगल तोडणाऱ्यानो आता तरी सुधरा

नाश पृथ्वीचा रे सारा आता बंद करा

पाऊस ही गेला मानवी हव्यासाने

हाल हाल झाले आता जंगल तोडीने

आता तरी सर्वानी वृक्ष भरपूर लावा

पृथ्वीला आपण नाशातून वाचवू या

जंगल तोडणाऱ्यानो आता तरी सुधरा

नाश पृथ्वीचा रे सारा आता बंद करा

संजय सोनवणे गातो गीत व्याकुळ होऊन

हाक तुम्हा देतो आता कर जोडून

शाळा, कॉलेजातून मोहीम हाती धर

पाणी, खत दया रे त्यांना वेळेवर

जंगल तोडणाऱ्यानो आता तरी सुधरा

नाश पृथ्वीचा रे सारा बंद करा.


Rate this content
Log in